अनेक खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर भाजपचा लाल शेरा, राज्यातील काही आयात खासदारांचं तिकीट कापणार ?

अनेक खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर भाजपचा लाल शेरा, राज्यातील काही आयात खासदारांचं तिकीट कापणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे याचा फटका भाजपच्या देशभरातील जवळपास 50 खासदारांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच महाराष्ट्रातीलही काही आयात खासदारांवर ही कारवाई केली जाणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातून 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये आलेल्या या खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या चार वर्षांत यापैकी काही आयात खासदारांनी पक्षासाठी काहीच भरीव काम केले नसल्याचा निष्कर्ष भाजपच्या संघटनमंत्र्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात काढला आहे. त्यामुळे अशा आयात खासदारांवर पक्षश्रेष्ठी नाराज असून २०१९ मध्ये त्यांचे तिकीटही कापण्याचा विचार केला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनमंत्र्यांनी देशभरातील ५० च्या आसपास खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा मारला आहे. यात महाराष्ट्रातील काही निष्ठावंतांसह आयात खासदारांचाही समावेश आहे. या खासदारांनी मतदारसंघात काय काम केले, पक्ष मजबुतीसाठी काय केले आणि केंद्राच्या किती योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या, लोकांना त्याचा किती लाभ मिळवून दिला या गोष्टींवर प्रगतिपुस्तकात भर देण्यात आला असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील भाजपच्या २३ खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती आहे. त्यापैकी 7 ते 8 खासदारांचे तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे आयात खासदार

1) धुळे – सुभाष भामरे (यापूर्वी शिवसेना)

2)पालघर – राजेंद्र गावित (यापूर्वी काँग्रेस)

3) सांगली – संजय पाटील (यापूर्वी – काँग्रेस)

4) नंदुरबार – हिना गावित (यापूर्वी – काँग्रेस)

5) भिवंडी – कपिल पाटील (यापूर्वी राष्ट्रवादी)

COMMENTS