कर्नाटकात येडियुरप्पाच मुख्यमंत्री होणार, जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर ?

कर्नाटकात येडियुरप्पाच मुख्यमंत्री होणार, जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर ?

बंगळुरु – कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी  हालचालींना वेग आला असून भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. जेडीएसला गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असून जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी केला आहे. तसेच भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी जेडीएसच्या कुमारस्वामींची भेट घेतली असल्याची माहिती आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा यांची नियुक्ती झाली असून ते राज्यपालांच्या भेटीला गेले असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान जेडीएसचे 4 आणि काँग्रेसचे आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर दुसरीकडे आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेस जोरदार प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. एक अपक्ष आमदार देखील भाजपसोबत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत असल्यामुळे 104 जागा मिळालेला भाजप 113 हा बहुमताचा आकडा कसा गाठतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कोणत्या पक्षाचे किती आमदार भाजपच्या गळाला लागणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे. भाजपाकडे हा काळा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी विचारला आहे.आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. बुधवारी कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

 

COMMENTS