भाजपला मोठा धक्का, आणखी एका खासदारानं दिला राजीनामा !

भाजपला मोठा धक्का, आणखी एका खासदारानं दिला राजीनामा !

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. आणखी एका खासदारानं पक्षावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेले काही महिने त्या सातत्याने मोदी सरकारवर जोरदार टीका करत होत्या. मोदी सरकार दलित विरोधी असल्याचा त्यांनी सातत्याने आरोप केला आहे.

दरम्यान सावित्रीबाई फुले या लखनऊतील बहराईच मतदारसंघाच्या खासदार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारचे धोरण हे दलितविरोधी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी  एप्रिल महिन्यात संविधान बचाव’ रॅली देखील काढली होती. या रॅलीमध्ये त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षावरही जोरदार टीका केली होती.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता.  लडाख येथून थूपस्तान छवांग,  मीणा राजस्थान येथून हरीश मीणा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता  उत्तर प्रदेशातून सावित्रीबाई फुले यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS