दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना सरकारी योजनांचा लाभ बंद करा, लोकसभेत मागणी !

दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना सरकारी योजनांचा लाभ बंद करा, लोकसभेत मागणी !

दिल्ली – लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायदा लागू करण्याची मागणी भाजपचे खासदार राघव लखनपाल शर्मा यांनी केली आहे. लोकसभेत त्यांनी ही मागणी केली असून लोकसख्या वाढीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर दोन पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सर्व सरकारी सेवा- सुविधा बंद करण्याची मागण त्यांनी केली आहे. एका पिढीला सुविधा न मिळाल्यास पुढील पिढी याबाबत अधिक जागरुक होईल असं मत त्यांनी लोकसभेत व्यक्त केलं आहे.

भाजपचे खासदार राघव लखनपाल शर्मा यांनी केलेल्या मागणीनंतर लगेच झारखंडमधील भाजपचे खासदार रविंद्र कुमार राय यांनीही ही मागणी लावून धरत दोन पेक्षा जास्त अपत्ये असलेल्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सर्व सरकारी सुविधा, सरकारी योजनांमधून मिळणारे लाभ बंद करावेत.  यात लहान मुलांची काही चूक नाही. पण बेजबाबदार आई-वडिलांमुळे ही वेळ ओढावल्याची जाणीव त्यांना होईल, एका पिढीला असा फटका बसला की त्याचे परिणाम पुढील पिढीवर दिसून येतील असं राय यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०१८ तयार करण्याची आवश्यकता असून यात दोन अपत्यांची सक्ती करावी तसेच तिसऱ्या अपत्याला सरकारी नोकरी आणि निवडणूक लढवता येणार नाही तसेच त्याला सरकारी अनुदानही दिलं जाणार नाही, अशी तरतूद या कायद्यात करण्याची मागणी खासदार राघव शर्मा यांनी केली आहे.

COMMENTS