भाजपचे आमदार आशिष देशमुख काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

भाजपचे आमदार आशिष देशमुख काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

नागपूर – गेली अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले आमदार आशिष देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच काँग्रेसमध्ये घरोबा करुन ते सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. गेली अनेक दिवसांपासून भाजपवर असलेली त्यांची नाराजी दिसून येत होती. अनेक वेळा त्यांनी भाजपवर जाहीर टीका केली आहे. तसेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेसनादरम्यान त्यांनी संघाच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावली नसल्यामुळे भाजपनं त्यांना नोटीस बजावली होती या नोटिसीचं उत्तर अद्यापपर्यंत त्यांनी दिलं नाही. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

 

दरम्यान आशीष देशमुख यांचा कटोल हा सध्याचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. काटोल सोडून ते सावनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं बोललं जात असून काँग्रेसचे सुनील केदार सावनेरचे आमदार आहेत. केदार हे देशमुख यांचे परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जात असून त्यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चांगले संबंध नाहीत. याचाच फायदा ते उचलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

COMMENTS