गोहत्या केली तर तुमचीही हत्या होईल–भाजप आमदार

गोहत्या केली तर तुमचीही हत्या होईल–भाजप आमदार

जयपूर – गेली अनेक दिवसांपासून गोहत्येचा मुद्दा देशभरात गाजत आहे. गोहत्या करणा-यांना कडक शासन करण्याची मागणी गोप्रेमी करत आहेत. तर गोहत्येमुळे अनेकांना मारही खावा लागलेला आहे. अनेक वेळा भाजपच्या नेत्यांनीही गोहत्या करणा-यांना तंबी दिल्याच पहावयास मिळालं आहे. परंतु आता भाजपच्या एका आमदारानं गोहत्येबाबत खळबळजनक वक्तव्य केलं असून गोहत्या केली तर तुमचीही हत्या केली जाईल असं राजस्थानमधील रामगढ येथील भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केलं आहे.

आमदार अहुजा यांनी म्हटलं आहे की, तुम्ही जर गोतस्करी अथवा गोहत्या कराल तर तुम्हालाही अशाचप्रकारे जमावाकडून मार देऊन जीव गमवावा लागेल. अलवार जिल्ह्यात गोतस्करीच्या आरोपाखाली झाकिर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यावर जमावानं ट्रक अडवून मारहाण केली, असा आरोप झाकिरनं केला आहे. त्यानंतर अहुजा यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपच्या एका आमदारानंच अशाप्रकारचं वक्तव्य केल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS