विदर्भातील पराभवाचं आत्मचिंतन करण्यासाठी भाजपची बैठक!

विदर्भातील पराभवाचं आत्मचिंतन करण्यासाठी भाजपची बैठक!

नागपूर – विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पराभवाचं आत्मचिंतन करण्यात येत आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या बैठकीत संघटनमंत्री विजय पुराणीक आणि भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती आहेत. चंद्रकांत पाटील हे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील भाजप कोअर कमिटी नेत्यांची ते बैठक घेत आहेत. विदर्भात भाजपच्या पराभवाचं आत्मचिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत सुरुवातीला वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. 2014 रोजी विदर्भात भाजपचे 62 पैकी 44 आमदार निवडून आले होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला. विदर्भातून भाजपच्या 29 जागा निवडून आल्या. त्यामुळे विदर्भातील भाजपच्या पराभवाची कारणं शोधायला पक्षानं सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील कोअर ग्रुपच्या नेत्यांची बैठक घेत आहेत. त्यामुळे आकामी निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी भाजपनं आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं जिसत आहे.

COMMENTS