भाजपला जोरदार धक्का, अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात !

भाजपला जोरदार धक्का, अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात !

मुंबई   आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राज्यातून मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या या पक्ष फुटीला नाशिकमधून सुरुवात झाली असून नाशिकमधील भाजपचे महत्वाचे पदाधिकारी व वसंत गीते आपल्या संमर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमधून भाजपला पहिला झटका बसणार असल्याचं दिसत आहे.

 हे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात

भाजपच्या स्थानिक युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अजिंक्‍य गिते, बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, जय कोतवाल, धनाजी लगड, आकाश तेजाळे हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत १ ऑगस्टला प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. संबंधित सर्व पदाधिकारी हे वसंत गीते यांचे समर्थक समजले जातात. मनसेतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करणारे हे पदाधिकारी अल्पवधीतच भाजपमध्ये सुद्धा अन्याय होत असल्याचं जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे हा वसंत गीते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

COMMENTS