नागपुरात भाजपला धक्का, व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

नागपुरात भाजपला धक्का, व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

नागपूर – भाजपला धक्का बसला असून व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धनराज फुसे यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नागपुरमध्ये आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान नागपूर काँग्रेससोबत आघाडीबाबत निर्णय झाला नसून 50-50 चा प्रस्ताव अजून पाठवला नाही. तसेच आघाडी करावी या विचारात असून 2014 च्या निवडणुकीपूर्वी फटका बसेल असा अंदाज आला होता, मात्र या यावेळी चित्र वेगळे आहे. पंतप्रधान मोदींना विक्रम करण्याची सवय असल्याने पेट्रोल/डिझेल शंभरी पार करण्याचा ते विक्रम करतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच राम कदमांसारखे आमदार भाजपकडे असल्याने भाजपची संस्कृती कुठली हा प्रश्न सध्या पडत असून शिवसेनेवर आता विश्वास राहिला नाही, भाजपच्या सावली खाली ते टिकून आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

COMMENTS