भाजप पदाधिकाय्राच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रे जप्त !

भाजप पदाधिकाय्राच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रे जप्त !

मुंबई – डोंबिवलीतील भाजप पदाधिकाय्राच्या दुकानात
170 प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने ही शस्त्रे जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुलकर्णीची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष असून डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस येथे त्याचे हे दुकान आहे.  त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. यात पिस्तूलचाही समावेश असून  भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहेे.

COMMENTS