‘त्या’ भाजप नगरसेवकासह ११ जणांना वाँटेड घोषित !

‘त्या’ भाजप नगरसेवकासह ११ जणांना वाँटेड घोषित !

पिंपरी-चिंचवड   भाजप नगरसेवक तुषार हिंगेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी वाँटेड घोषित केलं आहे. हिंगे यांच्यासह ११ आरोपी साडेतीन महिन्यांपासून गायब असल्यामुळे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं असून पोलिसांनी त्यांना वाँटेड घोषित केलं आहे. ३० सप्टेंबर २०१७ रोजी  महेश नारायण गारूळे आणि कालिदास गाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप तुषार हिंगे आणि त्यांच्या साथीदारांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंगेसह ११ आरोपी फरार आहेत.

दरम्यान याप्रकरणातील २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील ४ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तुषार हिंगेसह इतर ११ आरोपींनी अद्यापपर्यंत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला नसल्याचेही समोर आलं आहे. तसेच राजकीय दबावामूळे हिंगे यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात विरोधकांकडून केला जात आहे.

COMMENTS