युतीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून ‘या’ चार उमेदवारांची नावे जाहीर!

युतीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून ‘या’ चार उमेदवारांची नावे जाहीर!

मुंबई – शिवसेना-भाजपच्या युतीची खोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. वाई मतदारसंघातून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदारसंघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरेतून मनोज घोरपडे हे भाजपाचे उमेदवार असतील अशी घोषणा पाटील यांनी केली आहे. वाई येथील सभेत त्यांनी ही घोषणा केल्याची माहिती आहे.

कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच आहे. भाजपा आणि शिवसेनेतील काही जागांची अदलाबदलीचा विषय आहे. तो समन्वयातून सोडवू . तसेच पुढील काही दिवसांत भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसेल. भाजपाचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढत असून, भाजपाचा एकही उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार नाही अशी रचना भाजपने केली असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS