मुंबई मनपात महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत

मुंबई मनपात महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत

मुंबई : राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. त्यामुळे यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काॅंग्रेस आघाडी करणार नसून अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. यावर बोलताना मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले, काॅंग्रेस सर्व जागा लढण्याची तयारी करणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीला मदत होणार आहे. काॅंग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष भाजप असणार आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काॅंग्रेस ताकदीने काम करणार आहे.

 

COMMENTS