राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती, धनंजय मुंडेंना थेट आव्हान !

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती, धनंजय मुंडेंना थेट आव्हान !

बीड –  बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमाला भाजप नेते उपस्थिती लावणार आहेत. राष्ट्रवादीचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यामुळे क्षीरसागर बंधुंनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान दिलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान आज हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाचे पोस्टर बीडमध्ये झळकत आहेत. या पोस्टरवर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो पहावयास मिळत आहे. परंतु या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा बॅनरवर कुठेही धनंजय मुंडेंचा फोटो किंवा नाव पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याला स्थान दिलं नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच नेत्यांना  निमंत्रण देण्यात आलं असून जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या आमदारांचे फोटो शहरांमध्ये लावलेल्या बॅनरवर स्पष्टपणे झळकत आहेत.

COMMENTS