राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनाचा उद्याचा कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं भूमीपूजन !

राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनाचा उद्याचा कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं भूमीपूजन !

बीड – अंबाजोगाई येथील वाघाळा येथे आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या गुरुवारी ५ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार होता. परंतु भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढलला असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंञी पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग  सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली होती. परंतु भीमा – कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती व जनभावना लक्षात घेऊन हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS