डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील सर्व कृषीपंपांना कनेक्शन देणार – ऊर्जामंत्री

डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील सर्व कृषीपंपांना कनेक्शन देणार – ऊर्जामंत्री

मुंबई – राज्यात 2 लाख 39 हजार शेतीपंपाचे कनेक्शन प्रलंबित असून डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील सर्व कृषीपंपाना कनेक्शन दिले जातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अतिभारीत झाले आहेत. त्यामुळे आता 2 शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना आणण्यात असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.

दरम्यान आ. जयकुमार गोरे यांनी महावितरणकडून सातारा जिल्ह्यातील ग्राहकांना चुकीची वीज बिले देण्यात येत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्री उत्तर देत होते. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले – वीजबिले दुरूस्तीसाठी यापूर्वीही शिबिरे लावण्यात आली होती पुन्हा अशी शिबिरे लावली जातील. तसेच म्हसवड परिसरासाठी 132/33 केव्ही उपकेंद्रासाठी जागा घेतली होती. नंतरच्या काळात हे काम झाले नाही. राज्याची 2030 पर्यंत विजेची मागणी किती होणार, कुठे वीज अधिक लागणार याचे संपूर्ण नियोजन महापारेषणने केले आहे. केवळ ट्रान्सफॉर्मर अतिभारित असल्यामुळे कृषीपंपांचे कनेक्श्न प्रलंबित आहेत. यावर उपाययोजना म्हणून 2 शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना लवकरच होत आहे. 2360 कोटींची ही योजना असून राज्यातील सर्व शेतकरी या योजनेत आणले जातील. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज हवी असेल तर त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सहभागी व्हावे. या योजनेचे काम सुरू झाले आहे. सदस्यांनी आपल्या भागा‍तील शासकीय जमीन या योजनेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी सहकार्याचे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले.

COMMENTS