अशोक चव्हाणांनी आम्हाला राजकारणातील आदर्श सांगू नये – सुनील तटकरे

अशोक चव्हाणांनी आम्हाला राजकारणातील आदर्श सांगू नये – सुनील तटकरे

मुंबई –  अशोक चव्हाण यांनी आम्हाला राजकारणातील आदर्श सांगू नये. शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटतात त्यावरून सौदेबाजीचा आरोप करू नये. राज्यातील अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे नेते भेटतात. काँग्रेसचे नेते शरद पवारांची दिल्लीत भेट घेतात त्यामागे आदर्श काय ? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज चव्हाण सेंटर येथे चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. चिंतन बैठकीत पक्षाच्या कार्यक्रम तसेच भविष्याचा अजेंडा याबाबत चर्चा करण्यात आली.

COMMENTS