लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचा मोठा निर्णय ?

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचा मोठा निर्णय ?

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशोक चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काँग्रेस आजपासून मुंबई वगळता राज्यातील 44 मतदारसंघांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता असून त्यामुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांची दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राज्यात 2019 ची निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. (नांदेड आणि हिंगोली)  ज्यासाठी अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली होती.

COMMENTS