देशभरातील डॉक्टर जाणार संपावर !

देशभरातील डॉक्टर जाणार संपावर !

मुंबई –  नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. येत्या 2 एप्रिलला डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा दिला असून 25 मार्चला दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायत आयोजित केली होती. या मेळाव्याला देशभरातून 25 हजार डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी आले होते. या महापंचायतीतच या संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक हे वैद्यकीय व्यवसायाच्या विरोधात असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील डॉक्टरांच्या विरोधातील मुद्दे काढून टाकण्याची मागणी डॉक्टरांनी केली असून मागणी मान्य झाली नाही तर जोरदार संप करण्याचा इशाराही या कमिशननं दिला आहे. येत्या 2 एप्रिलरोजी डॉक्टरांनी संप पुकारला तर देशभरात मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं बोललं जात आहे.

COMMENTS