पुणे मतदारसंघात उमेदवार कधी जाहीर करणार ?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

पुणे मतदारसंघात उमेदवार कधी जाहीर करणार ?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपनं माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे संजय शिंदे यांचा विजय पक्का असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कधी जाहीर केला जाणार याबाबत प्रश्न विचारला असता
मसाला तयार आहे, कोंबडी शिजायला ठेवली आहे.
उमेदवार ठरला की लगेच जोरात प्रचार सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS