“ नाही तर म्हणाल अजित आज काय टाकून आलाय का ?”

“ नाही तर म्हणाल अजित आज काय टाकून आलाय का ?”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी आज इंदापूर येथील येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात जोरदार फटकेबाजी केली आहे. कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनातील बारा करोडच्या रेड्याचे उदाहरण दिले. बारा करोड रुपयांचा रेडा. होय बारा करोड रुपयांचा रेडा दिवसा ढवळ्या सांगतोय. नाही तर म्हणाल अजित काय आज टाकून आलाय का ?  असं वक्तव्य यावेळी अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात जोरदार हशा पिकला होता.

या प्रदर्शनात विविध जातीचे पाचशेहून अधिक घोडे विक्रीसाठी आणण्यात आले आहे.  हे प्रदर्शन पाहून घोडा हा आपल्या राज्याचे वैभव आहे. मात्र,  घोडे बाजारातील ज्ञान कौशल्य आणि अनुभव हे फक्त घोडेबाजारापुरतेच मर्यादित ठेवा. या अनुभवाचा उपयोग राजकीय घोडेबाजारात नसावा, नाही तर आयुष्याचे वाटोळे होते, असही यावेळी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

 

COMMENTS