पुन्हा सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार – अजित नवले

पुन्हा सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार – अजित नवले

मुंबई – पुन्हा एकदा सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा किसान महासभेचे महासचिव अजित नवले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहेत. तसेच हे निर्लज्ज सरकार असून यांच्याकडून काही अपेक्षा केली जाऊ शकत नसल्याची जोरदार टीका नवले यांनी केली आहे. पाच तारखेला शिराज्याभिषेक दिनाच्या पूर्व संध्येला गुजरात आणि कर्नाटकमधील दूध, पाकिस्तानची साखर, मोझ्याबिकची तूर तहसीलदार कार्यालयांमार्फ़त फडणवीस यांना भेट देणार असल्याचंही नवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पाच तारखेला सरकारकडून प्रतिसाद नाही मिळाला तर सात तारखेला शेतकऱ्यांना शहराकडे जाण्याचा आवाहन करणार असल्याचंही नवले यांनी म्हटलं आहे. तसेच दूध, शेतीमाल थांबवून 10 तारखेला महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी अजित नवले यांनी दिला आहे. तसेच ज्या शेतकरी संगठणांनी आता संप पुकारला आहे त्यांना आमचा पाठिंबा असल्याचंही नवले यांनी जाहीर केलं आहे.

COMMENTS