मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पक्ष स्थापनेनंतर राणे यांच्या पक्षाला एनडीएमध्ये येण्याचं आमंत्रण मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यातच राणे एनडीएमध्ये आले तर स्वागतच असं वक्तव्य काल भाजपचे प्रदेशाध्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यामुळे त्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच आगामी राज्यमंत्रिमंडळ विस्तारात राणेंचा मंत्री म्हणून संधी मिळू शकते असंही बोललं जातंय. त्यापार्श्वभूमीवर या भेटिला महत्व आलंय.
नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याबाबतही उत्सुकता आहे. राणे मंत्रिमंडळात आल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही बोललं जातंय. आजच रामदास कदम यांचीही पत्रकार परिषद आहे. एकूणच आज राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे.
COMMENTS