1999 मध्ये वाजपेयींनी पवारांना काय दिली होती ऑफर? प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट !

1999 मध्ये वाजपेयींनी पवारांना काय दिली होती ऑफर? प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट !

अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 सालीच शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या चिंतन शिबिरात केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सतत अपप्रचार केला जातो. पवार साहेबांचे नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध जोडले जातात. पण त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी पक्ष विचारधारेशी तडजोड करणारा नाही. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवारसाहेबांना बोलावून महाराष्ट्रात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण पक्षाने विचारधारेशी तडजोड केली नाही, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.

त्यावेळी  ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, रामविलास पासवान असे अनेक नेते एनडीएमध्ये गेले होते. मात्र तेव्हा मोठ्या पदाची ऑफर असूनही शरद पवार भाजपापासून दूर राहिले. तत्वांशी तडजोड न करता शरद पवार यांनी तेव्हा नकार दिला हेता, जर त्यावेळी त्यांनी ही ऑफर स्वीकारली असती तर शरद पवार यांना एनडीए सरकारमध्ये क्रमांक दोनच पद देऊ केले होते, असेही पटेल यावेळी म्हणाले.

 

 

COMMENTS