10 हजारांच्या मदतीसाठी पुन्हा जीआर, वाचा नव्या जीआरमध्ये काय आहे ?

10 हजारांच्या मदतीसाठी पुन्हा जीआर, वाचा नव्या जीआरमध्ये काय आहे ?

मुंबई – कर्जमाफीची घोषणा होण्याच्या आधीच शेतक-यांना पेरणीसाठी 10 हजार रुपायांची मदत करण्याच्या हेतून सरकारनं केलेली घोषणा ही बहुतेक शेतक-यांसाठी फक्त घोषणाच ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण आजही अनेक शेतक-यांना मदत मिळालेली नाही. आणि पेरणीचा हंगाम आता संपत आलाय. त्यामुळे सरकारविषयी शेतक-यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकार पुन्हा (14 जुलै रोजी) 10 हजार रुपयांच्या मदतीचा जीआर काढला आहे. त्यामध्ये बँकांनी शेतक-यांना तात्काळ 10 हजार रुपायांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र सरकार किती वेळा जीआर काढणार असा प्रश्न निर्माण झालाय. सककारच्या जीआरला बँका जुमानत नाहीत काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या नव्या जीआर नंतर तरी शेतक-यांना तातडीनं 10 हजार रुपयांची मदत मिळणार का हा प्रश्नच आहे.  खाली क्लिक करा आणि पहा काय आहे नव्या जीआरमध्ये.

000

 

COMMENTS