स्वार्थासाठी काही जणांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास रंगवला – शरद पवार

स्वार्थासाठी काही जणांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास रंगवला – शरद पवार

पुणे – शिवाजी महाराजांची इतिहासात रंगवलेली गोब्राम्हण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी आहे, शेजवलकरांनीही त्याला अऐतिहासीक म्हटलेलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पुण्यात लेखक श्रीमंत कोकाटे लिखीत छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी महाराजांबद्दलची चुकीची माहीती समाजात पसरवली जाते,  ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे असंही पवार म्हणाले. नव्या पिढीपर्यंत खरा इतिहास जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला शाळेत शिकवलेला शिवाजी महाराजांचा इतिहास चूकीचा होता,  विशिष्ट लोकांकडे शिकवण्याचे काम असल्यामुळे हे घडलं, अफजलखान मुसलमान होता म्हणून त्याचा कोथळा काढला नाही, तर तो रयतेच्या राज्यावर चालून आला होता म्हणून त्याचा कोथळा काढला असंही पवार म्हणाले. सज्जनाचं रक्षण आणि दूर्जनांचा नाश हे शिवछत्रपतींच सूत्र होतं, शिवछत्रपतींनी उभारलेलं राज्य कधी भोसल्यांचं राज्य झालं नाही, तर ते रयतेचं राज्य झालं अशा शब्दात त्यांनी मी पणा करणा-या आजच्य पिढीतल्या नेत्यांना टोला हाणला. ज्ञानाची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवला असा आरोप करत शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते असं चुकीचं चित्र रंगवलं असंही पवार म्हणाले. अफजलखनाचा कोथळा बाहेर काढला ,पण त्याचा साथीदार कृष्णाजी कुलकर्णी चीही हत्या केली. शिवाजी महाराज हे केवळ मुस्लिम विरोधी असते तर कुलकर्णीची सुटका झाली असती पण तसं झालं नाही कारण स्वराज्या विरोधात कुणीही आला तरी त्याला सारखीच शिक्षा शिवाजी महाराजांनी केली.

COMMENTS