केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या चौघांना अटक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या चौघांना अटक

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींचा पाठलाग करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली. स्मृती इराणींचा पाठलाग करणारे चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्मृती इराणी यांनी याप्रकरणी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 
स्मृती इराणी शनिवारी संध्याकाळी विमानतळावरुन परतत असताना चार मद्यधुंद तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तसेच स्मृती इराणी यांच्यासोबत म्यानमार दुतावासाजवळ हुज्जतही घातली. त्यानंतर फ्रान्स दुतावासाजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे चारही तरुण दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी आहेत.

 

COMMENTS