सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीत हल्ला, हल्लेखोर हिंदू सेनेचे असल्याचा संशय

सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीत हल्ला, हल्लेखोर हिंदू सेनेचे असल्याचा संशय

दिल्ली – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्यावर आज दिल्लीत पक्ष कार्यालयातच हल्ला झाला. येचुरी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत असताना दोन व्यक्ती तिथे आल्या आणि त्यांनी थेट येचुरी यांच्यावर हल्ला केला. मात्र तिथं असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांना पकडलं आणि त्यांना जोरदार चोप दिला. दोन्ही हल्लेखोरांनी हिंदू सेना झिंदाबाद, कम्युनिस्ट पार्टी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.  त्यामुळे दोन्ही हल्लेखोर हे  हिंदू सेनेचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्यात सीताराम येचुरी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर सीताराम येचुरी यांनी ट्विट करुन आपण संघाच्या गुंडगिरीला घाबरणार नसल्याचं म्हटलंय. दोन्ही हल्लेखोर हे हिंदू सेनेचे कार्यकर्ते होते का याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.उपेंद्र कुमार आणि पवन कौल अशी या आरोपींची नावे आहेत. मारहाणीच्या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

COMMENTS