संभाजीराजेंना केंद्रात मंत्रीपद, आरक्षणाची धग कमी करण्याची भाजपची खेळी ?

संभाजीराजेंना केंद्रात मंत्रीपद, आरक्षणाची धग कमी करण्याची भाजपची खेळी ?

नवी दिल्ली : राजघराण्याचा वारसा लाभलेले आणि कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या  गोटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची बैठक घेतली असता संभाजीराजे छत्रपती यांनी या बैठकीला हजेरी लावल्याने ते भाजपच्या गोटात सहभागी होतील हे निश्चित झाले आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपचं संसदीय सहयोगी सदसत्व स्वीकारलं आहे.

2019 मध्ये  होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच खासदारांची बैठक घेण्यात आली होते. मात्र भाजपच्या या खासदारांसोबत संभाजीराजे यांनी बैठकीला हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. आजच्या बैठकीला त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांना विचारले असता, संभाजीराजे म्हणाले मी केवळ संसदेतच भाजपचं सदस्यत्व ( सहयोगी) स्वीकारले आहे. दर मंगळवारी अधिवेशन काळात जी भाजपची संसदीय बैठक होते त्याला मी जात नाही, तसं बंधनही माझ्यावर नाही. मी कुणाकडे खासदारकी मागण्यास गेलो नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली निवड केलीय त्यांच्याप्रती आदर म्हणून त्यांनी बोलावलेल्या या बैठकीला हजर राहिलो. मागच्या अधिवेशनातही पंतप्रधानांनी बोलावलेल्या अशा बैठकीला उपस्थित होतो”, असं संभाजीराजे म्हणाले.

अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आता संभाजीराजे यांना थेट केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा मोर्चे सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंना मंत्रीपद देऊन, मराठा मोर्चाचं वादळ काही प्रमाणात शमवण्याचा सरकारचा हा प्रयत्न असेल, असं राजकीय जाणकारांचे मत आहे. सहयोगी सदस्यत्व स्वीकारून संभाजीराजेंनी आपल्या मंत्रिपदाचा मार्गही मोकळा ठेवला आहे की काय असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. संभाजी राजेंना मंत्रीपद दिल्याने मराठा समाज शांत होईल का ?  सध्याच्या स्थितीत आरक्षण देणं शक्य नाही म्हणून संभाजीराजांना मंत्रीपद देण्याचा घाट घातला जातोय का ?  आरक्षणच्या मुद्दावरुन एकवटलेल्या मराठा समाजात फूट पाडण्याचा भाजपा हा डाव आहे का ? संभाजी राजेंना मंत्रीपद दिल्याने भाजपला फायदा होईल का  ते त्यांच्यावर बूमरॅंग होईल ? हे प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहेत.

COMMENTS