संघ परिवारातील भारतीय मजदूर संघाचा संसदेला घेराव !

संघ परिवारातील भारतीय मजदूर संघाचा संसदेला घेराव !

जीएसटी आणि नोटबंदी या निर्णयाला सुरूवातीच्या काळात डोक्यावर घेतलेली जनता आता मात्र त्याच्यावर टीका करु लागली आहे. त्याच्यातून अपेक्षीत असलेले परिणाम जाणवले नाहीत. उलट त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतोय. त्यामुळेच सरकारच्या आर्थिक धोरणावरुन सध्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे.

सरकारच्या या धोरणावर विरोधक तर तुटून पडत आहेतच. पण त्याचबरोबर भाजपचे जुनजाणते नेतेही सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करत आहेत. आता तर संघ परिवारील भारतीय मजदूर संघाने मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. केवळ सत्ता बदलली धोरणे मात्र पूर्वीचीच आहेत. सरकार आर्थिक धोरणात नापास झाले आहे असा हल्लाबोल भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष ब्रजेश उपाध्याय यांनी केला आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या 17 तारखेला दिल्लीमध्ये भारतीय मजदूर संघातर्फे संसदेला घेराव घालणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील संघटीत आणि असंघटीत अशा जवळपास 92 टक्के लोकांचे शोषण सुरू आहे असा आरोपही उपाध्याय यांनी केला आहे. अरुण जेटली अर्थमंत्री म्हणून नापास झाले आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

COMMENTS