शेतक-यांची आज ‘महाराष्ट्र’ बंदची हाक

शेतक-यांची आज ‘महाराष्ट्र’ बंदची हाक

विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी आज राज्यभरात संप पुकारला असून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शेतक-यांनी मुंबई वगळता  महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

नाशिकमध्ये काल (रविवारी) शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकी झाली. या बैठकीत आज (दि. 5) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, सुकाणू समितीची निर्मिती करून त्यांची मंगळवारी (दि. 6) मुंबई येथे बैठक घेऊन संपाची रणनीती ठरविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सर्व मागण्या पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत पुढील चार दिवस संप सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

मोठ्या पोलिस बंदोबस्तात रविवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोमवारी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत डॉ. अजित नवले, बुधाजीराव मुळीक, रामचंद्र पाटील आदींनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संप फोडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी एक झाले तर दडपशाहीचे काही चालणार नाही. एकत्र आलेले शेतकरी सरकारला सळो की पळो करून सोडतील असे डॉ. नवले यांनी स्पष्ट केले. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले, की सोमवारचा संप यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातून एकही वाहन जाणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा.

COMMENTS