शिवसेनेने खांदेपालट पेक्षा सत्ता पालट करावे : राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेनेने खांदेपालट पेक्षा सत्ता पालट करावे : राधाकृष्ण विखे पाटील

पंढरपूर येथे संघर्ष यात्रा

 

पंढरपूर : शिवसनेने खांदे बदल करण्या ऐवजी सत्ता बदल करावे असे खुले आव्हान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. शिवसेनेचे मंत्री कर्ज माफी केली नाही तर राजीनामे देवू आणि राजीनामे खिश्यात ठेवले होते. आता सेनेने वाट पाहू नये. सत्तेतून बाहे पडून आमच्या संघर्ष यात्रेत सामील व्हावे असेही विखे म्हणाले. ते पंढरपूर येथे संघर्ष यात्रे निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

 

संघर्षयात्रेचे सोमवारी दुपारी पंढरपुरात आगमन झाले़. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्या नंतर इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विखे पाटील बोलत होते या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे, आ़ भाई जगताप, आ़ अबू आझमी, आ़ सुनील केदार, आ़ भारत भालके, आ़ प्रणिती शिंदे, शेकापचे प्रवीण गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़.

 

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारने शेतकयांचे कर्ज माफ करून आत्महत्येपासून परावृत्त करावे असे सांगून पवार म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ यंदा बरया पैकी पाऊस झाला़ शेतकरयानी पैशाची जुळवाजुळव करून चांगले उत्पादन घेतले़ मात्र यंदा बाजारात कोणत्याच पिकांना योग्य भाव नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला़ कांदा, तूर, ऊस यासह फळांनाही दर नसल्याने शेतकरयानी जेवढे खर्च केले तेवढेही त्यांच्या हाती पडले नाही़ मग शेतकरी आत्महत्या का करणार नाही? असा सवाल अजित दादा यांनी केला़

त्या नंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष विखे पाटील यांनी भाजपा आणि सेनेवर तोफ डागली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आता मंत्र्यांमध्ये खांदे पालट करावे लागणार आहे़ त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, आता खांदेपालट नकोय तर सत्तापालट करावे लागणार आहे़ शिवसेनेचे मंत्री गुळाला मुंगळा चिकटल्याप्रमाणे मंत्रीपदाला चिकटून बसले आहेत़. शिवसेनेचे मंत्री कर्ज माफी केली नाही तर राजीनामे देवू आणि राजीनामे खिश्यात ठेवले होते. आता सेनेने वाट पाहू नये. सत्तेतून बाहे पडून आमच्या संघर्ष यात्रेत सामील व्हावे असेही त्यांनी सेनेला टोला लगावला. या मेळाव्यात शेतकर्यांचा अल्प प्रमाणातील परीसाद दिसून आला. असे जरी असले तरी अवघ्या दीड ते दोन तासात पंढरपूर येथे येवून संघर्ष यात्रा आली पण आणि गेली पण.

 

मुख्यमंत्री आकाराप्रमाणेच शोषणकर्ते – प्रवीण गायकवाड 

 

राज्यांचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या शरीरांच्या आकरांकडे पाहूनच ते किती शोषण करणारे आहेत. यांचा अंदाज येतो. त्यामुळे तर राज्यातील शेतक-यांची अत्यंत दिन अवस्था दिसून येत आहे. असा टोला शेकापचे प्रवीण गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लगवाला आहे.

COMMENTS