वरळी नाका परिसरात नारायण राणे यांच्या विरुद्ध भाष्य तसेच टीका टिपण्णी करणारे पोस्टर शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले यांनी लावले होते. या पोस्टरमुळे नारायण राणे यांचे मुलगा निलेश राणे भडकले आहे. मुंबईकर तसेच सोशल मीडियासह प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यामुळे वडिलांचा अपमान सहन न करू शकलेले निलेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट करत आपला राग व्यक्त केला.
शिवसेनेची त्यांच्याच भाषेत लायकी काढणार अशा अर्थाचे ट्विट करून निलेश राणे यांनी शिवसेना पक्ष व उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध राणे पोस्टर वॉर पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही.
मुंबई भर आता बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार.. शिवसेनेच्या कुत्र्यानां आणि फावड्या उद्धव ची आता काही ठेवणार नाही
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 25, 2017
COMMENTS