शिवसनेची महत्वपूर्ण बैठक सुरू, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांची उपस्थिती !

शिवसनेची महत्वपूर्ण बैठक सुरू, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांची उपस्थिती !

शिवसेना भाजपचे ताणलेले संबंध, कर्जमाफीची स्थिती, त्यावर शेतक-यांच्या प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांचं कालचं कर्जमाफीविषयीचं भाषण यासह राज्यभरातील पक्षाची बांधणी यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक शिवसेना भवनात सुरू झाली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा प्रमुख आणि संपर्कप्रमुख उपस्थित आहेत.

विरोधी पक्षांसह शिवसेनेनंही सातत्याने शेतक-यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. काल मुख्य्मंत्र्यांनी याबाबत बोलताना सरसकट कर्जमाफीची मागणी म्हणजे अराजकता पसरवण्याचा प्रकार असल्याची टीका केली होती. तसंच 15 ऑगस्टला मंत्र्यांना झेंडा वंदन करु न देणा-या शेतक-यांना देशद्रोही म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागलंय. कर्जमाफीविषयी काय प्रतिक्रिया आहेत हेही उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. तस पक्ष बांधणीविषयीही चर्चा केली जाणार आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत.

COMMENTS