शिक्षिकांना मॅडम नको, ताई किंवा माई म्हणा, लातूर झेडपीचा नवा पॅटर्न !

शिक्षिकांना मॅडम नको, ताई किंवा माई म्हणा, लातूर झेडपीचा नवा पॅटर्न !

लातूर – लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी काढलेलं परिपत्रक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षिकांना मॅडम म्हणू नये असं सांगण्यात आलं आहे. त्याऐवजी ताई किंवा माई म्हणावे असं त्यामध्ये म्हटलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सकारात्मक नातेसंबंधाचा परिणाम मुलांच्या शिकणावर होतो. याचा विचार करुन शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते जेवढे सहज आणि स्नेहपूर्व राहील तेवेढे मुलांचे शिकणे दर्जेदार आणि आनंददायी होईल असं या परिपत्रका मागचा उद्देश असल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे आता यापुढे जिल्हा परिषदेतील शिक्षिकांना विद्यार्थ्यांनी ताई किंवा माई असंच म्हणावं लागणार आहे. तसंच ऊर्दू माध्यमातील शिक्षकांना बाजी असं म्हणावं लागेल. आजपर्य़ंत मुलांना शिक्षिकांना मॅडम म्हणण्याची सवय आहे. त्यामुळे आता ताई किंवा माई म्हणणे किती लवकर शिकतात ते पहावे लागेल.  या निर्णयाची सक्ती मात्र करण्यात आलेली नाही असंही परिपत्रात सांगण्यात आलं आहे. आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर या निर्णयाचा कधी आणि कसा परिणाम होईल ते पाहण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. मात्र या निर्णयाची चर्चा मात्र सगळीकडे होत आहे.

Letter by CEO Sir

COMMENTS