राष्ट्रीय रस्ते अपघात अहवाल प्रसिद्ध, वर्षभरात 1 लाख 50 हजार लोकांचा मृत्यू

राष्ट्रीय रस्ते अपघात अहवाल प्रसिद्ध, वर्षभरात 1 लाख 50 हजार लोकांचा मृत्यू

 नवी दिल्ली – 2016 मध्ये झालेल्या राष्ट्रीय रस्ते अपघाताचा अहवाल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसिद्ध केला आहे. वर्षभरात रस्ते अपघातामुळे तब्बल 1 लाख 50 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आले आहे.

2016 मध्ये एकूण 4 लाख 80 हजार  652 अपघात झाले. यात 1 लाख 50 हजार लोकांचा मृत्यू झाला असून दर तासाला 55 अपघात होतात आणि दर तासाला 17 लोक मृत्युमुखी पडतात. दुचाकी चालकांच्या अपघातात 52 हजार 500 दुचाकी चालक रस्ते अपघातात मृत्यू झाले. हेल्मेट घातले नसल्यामुळे 10 हजार 135 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे.

2015 च्या तुलनेत रस्ते अपघात 4.1 टक्क्यांनी कमी झाले. मात्र मृत्यू पावणा-या लोकांचे प्रमाण 3.2 टक्क्यांनी वाढले आहे. एकूण अपघातापैकी 86 टक्के अपघात हे 13 राज्यात झाले आहेत. या 13 राज्यांत महाराष्ट्राचा ही समावेश आहे.

 

 

COMMENTS