राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार नगरसेवकांचे निलंबन मागे

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार नगरसेवकांचे निलंबन मागे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना निलंबित करण्यात आले होते. आज या नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
शहराचा विकास करत असताना सर्वांबरोबर घेऊन जायचे आहे. त्या नगरसेवकांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे निलंबन मागे घेतले असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, मयुर कलाटे, अशी निलंबन मागे घेण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत 31 मार्च 2017 पर्यंतच्या सर्व अवैध बांधकामांना 100 टक्के शास्तीकर माफ करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीने महापौरांपुढील धाव घेतली होती. यावेळी नगरसेवकांनी सभेचे कामकाज रोखून धरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबन केले होते.

COMMENTS