रावसाहेब दानवेंनी थकवले अडीच लाखांचं वीजबिल !

रावसाहेब दानवेंनी थकवले अडीच लाखांचं वीजबिल !

जालना – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. रावसाहेब दानवे यांनी तब्बल 83 महिन्यांचे वीजबिलच भरले नसल्याचे वृत्त समोर आले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे.  या घराचे  83 महिन्यांच्या वीजबिलाची रक्कम तब्बल अडीच लाख रुपयांच्या घरातील आहे.

दानवेंचं भोकरदनमधील घराचं गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेलं आहे. विशेष म्हणजे महावितरणनेदेखील दानवेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

COMMENTS