महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी 2012 मध्ये रझा अकादमीविरुद्ध गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढला होता. ठाकरे यांनी मोर्चाला परवानगी नसतानाही भव्य मोर्चाचे आयोजन केल्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आले होते. हा खटलाच उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानादेखील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. त्याविरोधात डी बी मार्ग पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या संदर्भातले आरोपपत्र सहा महिन्यात दाखल होणं हे कायद्याच्या दृष्टीनं अपेक्षित असताना 2012तील ही केस असताना 2014आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. हाच तांत्रिक मुद्दा घेत पक्षाचे नेते शिरीष सावंत केस आणि एफआयआर रद्द करण्यात यावा अशी रीट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. राजेंद्र शिरोडकर आणि आर्चित साखळकर यांनी यावेळी पक्षातर्फे बाजू मांडली. यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत कोर्टाने केस आणि एफआयआर रद्द केला आहे.
COMMENTS