सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने रत्नाकर गुट्टेेे यांच्यावर अद्याप ही कारवाई नाही –  धनंजय मुंडे

सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने रत्नाकर गुट्टेेे यांच्यावर अद्याप ही कारवाई नाही – धनंजय मुंडे

गंगाखेड साखर कारखाना पिक कर्ज घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली.  यावेळी रत्नाकर गुट्टे यांच्या अटकेची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

आपल्या विरोधात कोर्टात किंवा पोलीसात शपथपत्र दिल्यास जीवनातून संपण्याची रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांना धमकी देत आहेत असे धनंजय मुंडे सांगितले. गुट्टे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने अटक होऊ नये म्हणून राजकीय दबाव येत असल्याच ही म्हणाले.

हायकोर्टाने  गंगाखेड प्रकरणी विशेष तपास पथक नियुक्त करण्याचे आदेश देऊनही पोलीसांनी कार्यवाही केली नाही. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात एफआयआर दाखल होऊनही अद्याप अटक केली नाही. असा सवाल मुंडेंनी यावेळी केला आहे.

COMMENTS