यंत्रमानवामुळे 33 टक्टे नोक-या जाणार !

यंत्रमानवामुळे 33 टक्टे नोक-या जाणार !

लंडन – येत्या 10 ते 12 वर्षांमध्ये यंत्रमानवामुळे इंग्लडमधील सुमारे 33 टक्के नोक-या जाण्याची शक्यता आहे. इंग्लडमधील एका संस्थेच्या हवाल्यानं बीबीसीनं हे वृत्त दिलं आहे. तर काही नोक-यांच्या कामाच्या स्वरुपामध्येही या यंत्रमानवामुळे बदल होण्याची शक्यता आहे. किरकोळ व्यापार आणि निर्माण विभागातल्या नोक-यांना या यंत्रमानवामुळे धोका पोहचण्याची जास्त शक्यता आहे. इंग्लड शिवाय इतर देशातल्या नोक-यांवरही संक्रात येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमेरिकेतील 38 टक्के, जर्मनीतील 35 टक्के आणि जपानमधील 21 टक्के नोक-या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढारलेल्या देशांमध्ये अनेक घरगुती कामाच्या ठिकाणी  यंत्रमानावाचा वापर सुरू झालेला आहे. त्यामुळे आतापासूनच त्याने नोक-यांवर संक्रात आणायला सुरूवात केली आहे. या पुढच्या काळात रेल्वे चालवण्यासाठीही यंत्रमानवाचा उपयोग होऊ शकतो. सरकारने अकुशल कामगारांना नवीन तंत्रज्ञान शिवकवण्याची गरज आहे असंही अहवालात सांगण्यात आलंय. तरच ते नव्या काळाबरोबर चालू शकतील असं अहवालात म्हटलंय. नोक-यांवर काही प्रमाणात संक्रात येणार असली तरी यामुळे उत्पादन क्षमता आणि त्यामुले अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असंही अहवाल सांगतो. भारताचा या अहवालात उल्लेख नसला तरीही त्याचा परिणाम भारतावरही येण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS