मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची निवडही थेट जनतेमधून व्हावी –  अण्णा हजारे

मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची निवडही थेट जनतेमधून व्हावी – अण्णा हजारे

राज्य सरकारच्या थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयावर राष्ट्रवादी आणि कॉग्रसने विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अण्णा हजारे म्हणालेत,’  सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. जनतेमधूनच थेट सरपंच निवडीचा निर्णय लोकशाहीला आणखी मजबूत करणार आणि खरी लोकशाही प्रस्थापित होण्यास यामुळे मदत होणार. शिवाय,’ सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजारला आळा बसणार. सरपंचांसोबतच मुख्यमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रपती यांची निवडही थेट जनतेमधून व्हावी. जनतेच्या हाती अधिकार देणारे निर्णय झाल्याशिवाय सत्तेचे विकेंद्रीकरण होणार नाही असे ही ते म्हणालेत.

COMMENTS