मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, आठवलेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, आठवलेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली –  मुंबईतील मध्यवर्ती तथा पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वपूर्ण असलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला   डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली . मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे ही मागणी रिपाइं तर्फे आपण मागील 12 वर्षांपासून करीत आहोत . मुंबई सेंट्रल हे मुंबईतील एक प्रमुख टर्मिनस आहे . मुंबईतील माध्य रेल्वेचे व्हीटी चे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे . त्याचे आम्ही स्वागत केले आहे . त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल टर्मिनसचेही नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्यात यावे . मुंबईत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. मुंबईतील महाविद्यालयात अध्यापनाचे काम ही त्यांनी केले . त्याकाळात अनेकदा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून प्रवास ही केला त्यावेळी तेथे ते काही वेळ थांबत असत . मुंबई सेंट्रल टर्मिनस ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कडे केल्यानंतर त्यांनी निश्चित याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ना रामदास आठवले यांना दिले .

COMMENTS