मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार कर्नाटक दौऱ्यावर

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार कर्नाटक दौऱ्यावर

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यावर भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटक मधील तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली असून या मतदारसंघात आजपासून ते  तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यात ते कर्नाटक मधील चिकोडी, गुलबर्गा  आणि रायचूर या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. सोमवार ते बुधवार दरम्यान या मतदारसंघातील पक्ष पदाधिका-यांच्या बैठका ते घेणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दुष्टीने पक्ष बळकट करण्यासाठी ही जबाबदारी  देण्यात आली आहे.

COMMENTS