मुंबईत उघड्यावर शौचविधी करणा-याला 100 रुपये दंड !

मुंबईत उघड्यावर शौचविधी करणा-याला 100 रुपये दंड !

मुंबई – उघड्यावर शौच करणाऱ्यांना आता  दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  त्यानुसार लोकांना 100 रुपये दंड करण्यात येणार आहे. क्लीन अप मार्शलमार्फत ही कारवाई होणार आहे. त्यासोबत मुकादम आणि जुनिअर ऑब्जर्वेअर यांनाही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने मुंबई हागणदारीमुक्त करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2016 मध्ये मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे पालिकेने जाहीरही केले. मात्र केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात मुंबईची रेटिंग घसरली. 29 व्या क्रमांकावर मुंबई फेकली गेल्यामुळे सर्वच स्तरांतून टीका झाली.  उघड्यावर शौचविधी उरकणाऱ्यांची संख्या काही कमी झाली नाही. अखेर केंद्राच्या नियमानुसार अशा नागरिकांना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार 500 मीटरच्या परिघात शौचालय उपलब्ध असूनही एखादी व्यक्ती त्याचा वापर करत नसल्यास, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे.

या कारवाई अंतर्गत उघड्यावर शौचविधी करताना आढळणाऱ्या व्यक्तींवर 100 रुपये एवढा दंड आकारला जाणार आहे. असे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.

 

 

COMMENTS