“मुंबईच्या गल्लोगल्लीत आजही अनेक ‘सुनील शितप’” !

“मुंबईच्या गल्लोगल्लीत आजही अनेक ‘सुनील शितप’” !

मुंबई – मुंबईत काल घाटकोपरमध्ये इमारत दुर्घेटना प्रकरणाचे जोरदार पडसाद आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांसह भाजपच्या सदस्यांनीही यावरुन महापालिकेच्या अधिकारी आणि सत्ताधा-यांना फैलावर घेतलं. महापालिकेतील सत्ताधा-यांच्या आशिर्वादाशिवाय अशी अनधिकृत कामे चालूच शकत नाही, असा घणाघाती आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शितप आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीशिवाय इमारतीत बदल घडूच शकत नाहीत. बिल्डिंगमधील रहिवाशांनी लेखी तक्रार करुनही महापालिकेच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला असा आरोपही विखे पाटील यांनी केला. सुनील शितप हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्याची दहशत कुणाच्या आशिर्वादाने सुरू होती असा सवाल करत आजही मुंबईच्या गल्लोगल्ली सुनील शितप सारख्या विकृती आहेत असंही विखे पाटील म्हणाले. इमारतीत एवढे बदल कसे झे ?  हे बदल महापालिका अधिकारी आणि वॉर्ड अधिकारी यांना माहिती नव्हते का ?  असा सवालही त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.

COMMENTS