मुंबईकरांच्या मदतीला शिवसेनेचे खासदार, आमदार धावले – उद्धव ठाकरे

मुंबईकरांच्या मदतीला शिवसेनेचे खासदार, आमदार धावले – उद्धव ठाकरे

मुंबई – मुसळधार पावसात मुंबईकरांच्या मदतीला शिवसेनेचे खासदार, आमदार धावल्याचे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्दावर मला राजकारण करायचे नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.नालेसफाई झाली नाही या आरोपात तथ्य नाही. महापौरांसह पालिका कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून परिस्थिती हाताळली आहे. आरोप करणारे यावेळी कोठे होते? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

#शिवसेनेचे आमदार आणि खासदारही मदतकार्यात गुंतले होते

#नालेसफाईत हलगर्जीपणा झालेला नाही

#बेस्ट, मनपा कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख पार पाडले

#पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ण नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईत काम करणाऱ्या सर्व संस्थांना समन्वय साधावा लागेल, राजकारण करुन प्रश्न सुटणार नाही – उद्धव ठाकरे

#पावसाच्या मुद्यावर मला राजकारण करायचे नाही, नीच पातळीवर उतरायचे नाही – उद्धव ठाकरे

#मिठी नदीला २६ जुलै २००५ रोजी पूर आला होता, पालिकेच्या कामामुळेच यंदा मोठा पाऊस होऊनही मिठीला पूर आलेला नाही – पालिका आयुक्त

#२६ जुलै सारखाच एकाच दिवशी अतिपाऊस झाला, पण पालिकेने स्थिती नियंत्रणात आणली आहे – पालिका आयुक्त

#मुंबईत दुपारी ३ ते ५ दरम्यान तुफान पाऊस पडला

मुंबईतील ८-१० ठिकाणी एक तासात जवळपास १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला- अजॉय मेहता

#रविवारपासून आरोग्य शिबिरांची व्याप्ती वाढवणार

#मुंबईकरांनो आरोग्याच्या बाबतीत काळजी करू नका

#शिबिरांमध्ये लक्षणं बघून औषधं देतील

#शिवसेना मुंबईभर आरोग्य शिबिरं सुर करणार आहे

#रोगराईयेऊ नये यासाठीच्या फवारणीमध्ये वाढ करण्यात आली आहे

#मंदीर, मशीद,चर्चमध्ये लोकांच्या निवाऱ्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली

COMMENTS