मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची हाफसेंचुरी !

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची हाफसेंचुरी !

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालनुसार भाजपनं 50 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं दुसरं स्थान पटकावत 19 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसनं 12 जागा जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे. पहिल्या काही टप्प्यात शिवसेना तिस-या क्रमांकवर फेकली होती. मात्र मराठी पट्ट्यानं काही प्रमाणात शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे शिवसेना दुस-या क्रमांकावर पोहचू शकली आहे. राष्ट्रवादी  काँग्रेस आणि मनसेला अजून खातंही उघडता आलं नाही. अपक्ष आणि इतरांनी 2 जागा जिंकल्या आहेत.

COMMENTS