माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात; शून्यातून विश्व निर्माण करेन –  खडसे

माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात; शून्यातून विश्व निर्माण करेन – खडसे

पुणे –  पुरस्कार मिळणे म्हणजे कारकीर्द संपली, असे नाही तर ती कामाची पोचपावती आहे. मात्र, काहींना असे वाटत असले तरी आता खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. आता मी शून्यातून विश्व निर्माण करेन, असा विश्वास माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (शनिवारी) पुण्यात व्यक्त केला.  

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या वितरणापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव जाधवर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, जेव्हा माणूस करियरच्या अत्युच्च बिंदूवर असतो तेव्हा त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मी पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहे. त्यामुळे माझे करियर अद्याप संपलेले नाही. उलट माझ्या कारकिर्दीला आता कुठे सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS