माजी आमदार देवेंद्र साटम यांची शिवसेनेतून हकालपट्टी !

माजी आमदार देवेंद्र साटम यांची शिवसेनेतून हकालपट्टी !

रायगड – शिवसेनेचे कर्जतचे तीन वेळा आमदार राहिलेले देवेंद्र साटम यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. साटम यांची गेल्या काही दिवसांपासून पक्षातल्या नेत्यांशी वाद सुरू होता. त्यामुळे ते भाजपमध्येही जाणार अशी चर्चा होती. मात्र त्याला मुहूर्त मिळत नव्हता. आता त्याला मुहूर्त मिळाला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडण्याआधीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

साटम यांची खालापूर आणि परिसरात चांगली ताकद आहे. त्याचा फटका आता शिवसेनेला बसणार आहे. साटम हे कदाचित येत्या निवडणुकीत कर्जतमधून भाजपचे विधानसभेचे उमेदवारही असू शकतील.

COMMENTS